लेवा सम्राज्ञी फाउंडेशनतर्फे आयोजित स्पर्धेत देवेश्री सराफ यांचा सन्मान
लेवा सम्राज्ञी फाउंडेशनतर्फे आयोजित स्पर्धेत देवेश्री सराफ यांचा सन्मान
लेवाजगत न्युज जळगाव : लेवा सम्राज्ञी फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने दि. २५ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व व स्वलिखित कविता स्पर्धेत देवेश्री भरत सराफ यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वशैलीने आणि शब्दसौंदर्याने रसिकांची मने जिंकत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेदरम्यान देवेश्री सराफ यांनी सादर केलेल्या स्वलिखित कवितांनी तसेच ओघवत्या व प्रभावी भाषणशैलीने उपस्थित प्रेक्षक व परीक्षकांवर अमीट ठसा उमटवला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना मानाचे सन्मानचिन्ह (ट्रॉफी) प्रदान करून गौरविण्यात आले.
हा सन्मान म्हणजे त्यांच्या प्रतिभेचा गौरव, सातत्यपूर्ण कष्टांची पावती आणि अमोघ वाणीचा यथोचित सन्मान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमास साहित्यप्रेमी, मान्यवर आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सौजन्य भंगाळे गोल्ड व भंगाळे सिल्क, जळगाव यांचे लाभले.
देवेश्री भरत सराफ यांचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत