Contact Banner

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त रक्तदान

dr-ulhas-patil-medical-college-rajmata-jijau-swami-vivekan


डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त रक्तदान

लेवाजगत न्यूज जळगाव - राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबीरात ५३ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्या विद्यार्थ्यांना प्रशस्त्रीपत्र देण्यात आले.

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन गोदावरी फउंडेशनचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकीय रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी शिवराज दाभाडे, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे प्रा.डॉ. पियुष वाघ यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबीरात उत्स्फुर्त सहभाग घेतला.

५३ विद्यार्थ्यांनी केले रक्तदान

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त वैद्यकीय महाविद्यालयाच्या ५३ विद्यार्थ्यांनी रक्तदान करून अनोखे अभिवादन केले. तसेच यावेळी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत विद्यार्थ्यांनी रक्तदानासाठी आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.