सावदा येथे भाजप–शिवसेना युतीकडून उपनगराध्यक्षपदी पठाण फिरोज खान यांची बिनविरोध निवड
सावदा येथे भाजप–शिवसेना युतीकडून उपनगराध्यक्षपदी पठाण फिरोज खान यांची बिनविरोध निवड
लेवाजगत न्यूज सावदा (प्रतिनिधी) :- सावदा नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आज पार पडलेल्या पहिल्या विशेष सभेत उपनगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध करण्यात आली. भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीच्या पाठिंब्याने यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली.
या विशेष सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्षा रेणुका राजेंद्र पाटील यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याधिकारी भूषण वर्मा , सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील आदी उपस्थित होते. उपनगराध्यक्षपदासाठी प्रारंभी काही तणावपूर्ण चर्चा झाल्या; मात्र अखेर सर्वसंमतीने निवड बिनविरोध पार पडली.
याच सभेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजप–शिवसेना युतीकडून सुरज परदेशी यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनील उर्फ बंटी जंगले यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली.
भाजप–शिवसेना युतीच्या या एकजुटीमुळे शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. नवनिर्वाचित नगरसेवक, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने सभास्थळी उपस्थित होते. स्थानिक नागरिक व राजकीय निरीक्षकांच्या मते, ही निवड नगरपालिकेतील प्रशासकीय स्थिरता व विकासकामांना गती देणारी ठरेल. येत्या काळात पाणीपुरवठा, रस्ते विकास तसेच अन्य मूलभूत नागरी सुविधांवर विशेष भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत