डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनी देशभक्तीचा उत्साह
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनी देशभक्तीचा उत्साह
लेवाजगत न्यूज | जळगाव :
येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, डीन डॉ. प्रशांत सोळंके, संचालक डॉ. एन. एस. आर्वीकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, मेडिकल सुपरिटेंडन्ट डॉ. प्रेमचंद पंडित, होमिओपॅथी कॉलेजचे डीन डॉ. राकेश मिश्रा, आयुर्वेद कॉलेजचे डॉ. हर्षल बोरोले, फिजिओथेरपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, नर्सिंग कॉलेजच्या प्रिन्सिपल विशाखा वाघ, केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रिन्सिपल शिवानंद बिरादार यांच्यासह वैद्यकीय रुग्णालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांमध्ये देशभक्तीचा उत्साह निर्माण केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत