फैजपूर नगरपरिषदेत राजकीय समन्वय; निखिता कोळी यांची बिनविरोध उपनगराध्यक्षपदी निवड
फैजपूर नगरपरिषदेत राजकीय समन्वय; निखिता कोळी यांची बिनविरोध उपनगराध्यक्षपदी निवड
लेवाजगत न्यूज | फैजपूर प्रतिनिधी
फैजपूर नगरपरिषदेच्या राजकारणात आज एक नवा अध्याय लिहिला गेला असून अवघ्या २३ वर्षांच्या सौ. निखिता प्रकाश कोळी यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राज्यातील सर्वात तरुण उपनगराध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाल्याने फैजपूरसह संपूर्ण जिल्ह्यात या निर्णयाची चर्चा होत आहे.
भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षा सौ. दामिनी सराफ यांचे पती पवन सराफ यांची काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रस्तावावर स्वीकारत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. या निवडीमुळे नगरपरिषदेत पक्षीय राजकारणापेक्षा समन्वयाने निर्णय घेण्याची परंपरा अधोरेखित झाली आहे. तसेच भाजपाच्या प्रस्तावावर राहुल गुजराथी यांचीही स्वीकारत सदस्यपदी निवड करण्यात आली.
निवडीनंतर उपनगराध्यक्ष सौ. निखिता कोळी यांनी सर्व नगरसेवकांचे मनापासून आभार मानले. नगराध्यक्षा, सर्व पक्षीय नगरसेवक आणि प्रशासन यांना सोबत घेऊन फैजपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तरुण पिढीला नेतृत्वाची संधी मिळाल्याने शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नगरपरिषद सभागृहात ही निवड प्रक्रिया शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. कोणताही वाद अथवा विरोध न होता सर्वानुमते निवड झाल्याने नगरपरिषदेत राजकीय समन्वयाचे सकारात्मक चित्र दिसून आले. यावेळी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, अधिकारी व कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
आगामी कार्यकाळात फैजपूरच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत