उत्कृष्ट कामगिरीबद्दल सावदा पोलिसांचा सन्मान ; यशस्वी तपासाची वरिष्ठांकडून दखल
उत्कृष्ट कामगिरीबद्दल सावदा पोलिसांचा सन्मान ; यशस्वी तपासाची वरिष्ठांकडून दखल
सावदा लेवाजगत प्रतिनिधी-सावदा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक 284/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 309(4) प्रमाणे नोंद असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची सावदा पोलिसांनी अल्पावधीत यशस्वी उकल केली. माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व SDPO सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
तपासादरम्यान कोणतीही ठोस माहिती नसतानाही गोपनीय बातमीच्या आधारे दोन आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपी अब्बास इबाबत शेख इराणी व मोहम्मद अली उर्फ पद्दू काला अली इराणी आहेत. त्यांच्याकडून चोरीस गेलेला सुमारे १ लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल, त्यात २३ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, हस्तगत करण्यात आली असून गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे.
तसेच आरोपींकडून मलकापूर येथून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली असून त्यामुळे मलकापूर पोलीस स्टेशनमधील संबंधित गुन्हाही उघडकीस आला आहे.
या उल्लेखनीय व प्रभावी कामगिरीची दखल घेत माननीय पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस हवालदार संजीव एकनाथ चौधरी तसेच निलेश बाविस्कर व मयूर पाटील यांच्या कार्याचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या सत्कारामुळे पोलिस दलाचे मनोबल वाढले असून भविष्यातही गुन्हेगारीविरोधात अधिक प्रभावी कारवाई करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत