स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; चोरीच्या तीन मोटरसायकली जप्त, दोन आरोपी ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; चोरीच्या तीन मोटरसायकली जप्त, दोन आरोपी ताब्यात
लेवाजगत न्युज जळगाव : स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत चोरीच्या तीन मोटरसायकली जप्त केल्या असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
जामनेर पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील दोन मोटरसायकली तसेच भुसावळ शहर पोलिस स्टेशन येथील एका गुन्ह्यातील एक मोटरसायकल अशी एकूण तीन चोरीच्या मोटरसायकली स्थानिक गुन्हे शाखेला हस्तगत करण्यात यश आले आहे.
या प्रकरणी आरोपी नामे
१) अनुराग लक्ष्मण सूनगत (वय १९, रा. वाकी रोड, हरी ॐ नगर, जामनेर)
२) दर्शन बाप्पू चव्हाण (वय १८, रा. संत सेवालाल नगर, जामनेर)
यांना ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली असता, त्यांनी त्यांच्या एका साथीदाराच्या मदतीने सदर मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान आरोपींकडून खालील गुन्ह्यांतील मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
जामनेर पोलिस स्टेशन –
गुन्हा रजिस्टर नंबर १८/२०२६, BNS 303(2)
गुन्हा रजिस्टर नंबर ३८/२०२६, BNS 303(2)
भुसावळ शहर पोलिस स्टेशन –
गुन्हा रजिस्टर नंबर १७७/२०२४, BNS 303(2)
जप्त मुद्देमालासह आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी जामनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक रवी नरवाडे, तसेच पोलीस कर्मचारी गोपाळ गव्हाडे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी व राहुल वानखेडे यांच्या पथकाने केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत