Contact Banner

रस्ता–नाली कामांसाठी मिक्सरद्वारेच काँक्रीट तयार करावे स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रक्रिया राबवण्याची मागणी – नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाणे



रस्ता–नाली कामांसाठी मिक्सरद्वारेच काँक्रीट तयार करावे

स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रक्रिया राबवण्याची मागणी

– नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाणे

नांदगाव खंडेश्वर (तालुका प्रतिनिधी):
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत अंतर्गत सुरू असलेल्या व प्रस्तावित रस्ता व नाली बांधकाम कामांमध्ये वापरण्यात येणारा काँक्रीटचा माल हा हाताने न बनवता केवळ काँक्रीट मिक्सर मशीनद्वारेच तयार करण्यात यावा, अशी ठाम मागणी नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाणे यांनी केली आहे.

विकास कामांमध्ये पारदर्शकता यावी, तसेच काँक्रीटचे योग्य प्रमाण (सिमेंट, वाळू, खडी) शासनाच्या नियमांनुसार वापरले जात आहे का, याची खात्री व्हावी, यासाठी काँक्रीट तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया स्थानिक नागरिक, प्रभागातील लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक–नगरसेविका व जागरूक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यासंदर्भात नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाणे यांनी नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले आहे. निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, दर्जेदार काँक्रीट वापरल्यास रस्ते व नाल्यांचे आयुष्यमान वाढेल, तसेच शासकीय निधीचा योग्य व परिणामकारक वापर होईल.

संबंधित ठेकेदार व बांधकाम विभागाला स्पष्ट सूचना देऊन, प्रभागातील नागरिक व लोकप्रतिनिधींच्या देखरेखीखालीच मिक्सरद्वारे काँक्रीट तयार करण्याची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.