Contact Banner

जीवनदान महाकुंभातून रक्तदानाची चळवळ – यावल येथे ८२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

 

jivandan-mahakumbhatun-raktdanachya-chalval-yawal-82-raktdatyanni-raktdan


जीवनदान महाकुंभातून रक्तदानाची चळवळ – यावल येथे ८२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

लेवाजगत न्यूज आमोदा- यावल येथे जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज (रामानंदाचार्य दक्षिणपीठ, नाणिजधाम) यांच्या प्रेरणेने आयोजित जीवनदान महाकुंभ २०२६ हा उपक्रम दिनांक ४ जानेवारी ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत संपूर्ण देशभर राबविण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ दिवस चालणाऱ्या या महाकुंभाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा महाआयोजन संस्थेतर्फे करण्यात आले.

मानवी जीवनात दानाचे महत्त्व अनमोल असले तरी, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. एका थेंबानेही एखाद्याचे प्राण वाचू शकतात. समाजात मायक्रोसाइटिक अ‍ॅनिमिया, सिकलसेल, हिमोफिलिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर यांसारख्या गंभीर आजारांशी झुंज देणारे हजारो रुग्ण आजही रक्ताच्या एका थेंबासाठी तडफडत आहेत. अशा रुग्णांसाठी जीवनदान महाकुंभ आशेचा किरण ठरत आहे.

याच उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात पंचायत समिती, यावल येथे रामानंद संप्रदाय यावल तालुक्याच्या माध्यमातून दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राकेश कोलते, डॉ. कुंदन फेगडे, उज्जैन सिंग राजपूत, उमेश फेगडे, योगेश चौधरी उपस्थित होते. तसेच रामानंद संप्रदायाचे यावल तालुक्यातील पदाधिकारी व भाविक भक्त राजेंद्र चौधरी सर, विनोद पाटील, सुनील भारंबे, गोवर्धन चौधरी, ज.न.म. प्रवचनकार हेमलता टोके, सुधाकर माहूरकर, अतुल पाटील, गणेश तळेले, अंबादास सपकाळे, सदाशिव तायडे, विलास कोळी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आयोजकांनी रक्तदात्यांचे आभार मानून सामाजिक बांधिलकी जपत असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.