Contact Banner

ज्योती विद्यामंदिर येथे माजी विद्यार्थी संघाची स्थापना




ज्योती विद्यामंदिर येथे माजी विद्यार्थी संघाची स्थापना

सांगवी बुद्रुक (ता. ):
ज्योती विद्यामंदिर, सांगवी बुद्रुक येथे बुधवार, दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. यानिमित्त आयोजित सहविचार सभेत सर्वानुमते माजी विद्यार्थ्यांमधून संजय जहाबाज तडवी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

नवनियुक्त अध्यक्षांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक आर. एम. भंगाळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. ए. पाटील यांनी करताना माजी विद्यार्थी संघाची भूमिका, उद्दिष्टे व भावी कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांसमोर मांडली.

या विचारांनी प्रेरित होऊन माजी विद्यार्थिनी प्रमिला रामू कुरकुरे (रा. खिरोदा, माहेर – चितोडा) यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी साहित्याकरिता ₹१,०००/- रोख देणगी दिली. तसेच नवनियुक्त अध्यक्ष संजय तडवी यांनी क्रीडा विभागासाठी हवेचा पंप भेट स्वरूपात दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक पी. एम. भंगाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन समन्वयक सतीश सरोदे (भाऊसाहेब) यांनी केले.

माजी विद्यार्थी संघाची स्थापना अत्यंत उत्साही व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी शाळेविषयी आस्था व अभिमान असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमास माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.