हृदयविकाराच्या रुग्णांसाठी महादेव हॉस्पिटलमध्ये अद्ययावत तपासणी सुविधा उपलब्ध
हृदयविकाराच्या रुग्णांसाठी महादेव हॉस्पिटलमध्ये अद्ययावत तपासणी सुविधा उपलब्ध
लेवाजगत न्युज जळगाव :
वाढते प्रदूषण, धावपळीची जीवनशैली आणि ताणतणावामुळे हृदयविकाराच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव येथील महादेव हॉस्पिटलमध्ये ‘सुपर स्पेशालिटी’ विभागांतर्गत हृदयरोग रुग्णांसाठी अत्याधुनिक तपासणी सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार अद्ययावत शस्त्रक्रियाही येथे करण्यात येत आहेत.
महादेव हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागात रुग्णांसाठी एकाच छताखाली सर्व महत्त्वाच्या तपासण्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. येथे अनुभवी व तज्ज्ञ हृदयरोग तज्ज्ञांकडून तपासणी केली जाते. हृदय तपासणीसाठी ईसीजी, २डी इको, टीएमटी यांसारख्या अत्याधुनिक चाचण्या केल्या जातात.
यासोबतच सीबीसी, रँडम बीएसएल, लिपिड प्रोफाईल, एचबीए1सी तसेच किडनी फंक्शन टेस्ट यांसारख्या आवश्यक तपासण्यांचीही सुविधा उपलब्ध आहे. हृदयविकाराची लक्षणे जाणवताच त्वरित व अचूक निदान होणे अत्यंत आवश्यक असते. महादेव हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेली अद्ययावत यंत्रणा व अनुभवी डॉक्टरांमुळे अचूक निदान आणि वेळेवर उपचार शक्य होत आहेत.
हृदयविकाराशी संबंधित तपासणी व उपचारासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी महादेव हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9325150004, 9588476596 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत