'महादेव हॉस्पिटल'मध्ये डोळ्यांच्या आजारांवर अत्यल्प दरात उपचार
'महादेव हॉस्पिटल'मध्ये डोळ्यांच्या आजारांवर अत्यल्प दरात उपचार
वाढणाऱ्या नेत्रविकारांसाठी विशेष सवलत उपलब्ध
लेवाजगत न्युज जळगाव प्रतिनिधी : बदलत्या जीवनशैलीमुळे डोळ्यांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ होत आहे. हीच गरज ओळखून जळगाव येथील आकाशवाणी चौकातील प्रसिद्ध महादेव हॉस्पिटल मधील 'नेत्रशल्यचिकित्सा' विभागाद्वारे रुग्णांसाठी विशेष सवलत आणि तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सर्वसामान्य रुग्णांना परवडेल अशा दरात डोळ्यांची अचूक तपासणी केली जात आहे. डोळ्यांच्या विविध गंभीर आजारांवर अनुभवी डॉक्टरांकडून सखोल मार्गदर्शन व निदान केले जात आहे. रुग्णाच्या गरजेनुसार योग्य आणि परिणामकारक औषधोपचार दिले जातात. मोतीबिंदू तसेच डोळ्यांच्या इतर शस्त्रक्रिया महादेव हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात केल्या जात आहेत.
रुग्णांनी सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महादेव हॉस्पिटल, जळगाव येथे डोळ्यांच्या कोणत्याही तक्रारीसाठी किंवा अधिक माहितीसाठी त्वरित हॉस्पिटलशी संपर्क (९३२५१५०००४, ९५८८४७६५९६)साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत