श्री स्वामिनारायण मंदिर मोहराळा येथे दशाब्दी महोत्सव व श्रीमद् देवी भागवत कथा भक्तिमय वातावरणात
श्री स्वामिनारायण मंदिर मोहराळा येथे दशाब्दी महोत्सव व श्रीमद् देवी भागवत कथा भक्तिमय वातावरणात
लेवाजगत न्यूज मोहराळा-येथील श्री स्वामिनारायण मंदिरात दि. १७ ते २३ जानेवारी या कालावधीत दशाब्दी महोत्सवानिमित्त श्रीमद् देवी भागवत कथा मोठ्या भक्तिभावाने सुरू आहे. या कथांचे प्रवक्ते स. गु. शास्त्री भक्ती प्रकाशदासजी (वेदांताचार्य, व्याकरणाचार्य) असून, ते आपल्या मृदुल व प्रभावी मराठी शैलीत हजारो हरिभक्तांना कथांचे अमृतपान घडवत आहेत.
मंगळवारी झालेल्या कथांच्या दिवशी तीर्थक्षेत्र वडताळ धाम स्वामिनारायण मंदिराचे वंशज गादीपती लालजी सौरभ महाराज यांनी उपस्थित राहून हरिभक्तांना आशीर्वाद दिले. मोहराळा या छोट्याशा खेडेगावात हजारो भाविकांची उस्फूर्त उपस्थिती पाहून लालजी महाराज मंत्रमुग्ध झाले. यावेळी त्यांनी “भगवंत प्राप्तीसाठी भगवंताची मनोभावे, निष्ठेने व सातत्याने पूजा करावी” असा मोलाचा संदेश सर्व हरिभक्तांना दिला. त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.
दशाब्दी महोत्सवाचे अध्यक्ष स. गु. शास्त्री कोठारी भगवत्स्वरूपदासजी महाराज असून, त्यांच्या संपूर्ण शिष्यवृंदाची उपस्थिती लाभत आहे. तसेच स. गु. शास्त्री धर्मस्वरूपदासजी, स्वामी गोविंदप्रसाददासजी, स्वामी वेदान्तवल्लभदासजी, स्वामी केशवचरणदासजी, केशवजीवनदासजी, शा. हरिचरणदासजी, स्वामी सूर्यप्रकाशदासजी आदी संतांची उपस्थिती या महोत्सवाला लाभली आहे.
या सात दिवसीय भक्तिमय उत्सवात यज्ञकार्याचा प्रारंभ करण्यात आला असून, यावल पंचक्रोशीसह अखिल खान्देशातील सत्संग समाज मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. भगवान स्वामिनारायण व भगवती देवीची उपासना, हिंदू धर्माची जनजागृती, हरिनामाचा संदेश जन-जनांपर्यंत पोहोचवणे तसेच आदर्श जीवनमूल्यांची जोपासना करण्यासाठी श्रीमद् देवी भागवत कथा हे श्रेष्ठ साधन आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत