विद्यार्थी व शिक्षकांच्या नवोन्मेषी विकासासाठी ‘सृजनकुंभ’ परिषद दिशादर्शक ठरली
विद्यार्थी व शिक्षकांच्या नवोन्मेषी विकासासाठी ‘सृजनकुंभ’ परिषद दिशादर्शक ठरली
लेवाजगत न्यूज कल्याण -विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण बौद्धिक, तांत्रिक व सर्जनशील विकासासोबतच शिक्षक व प्राध्यापकांच्या ज्ञानवृद्धी, संशोधनाभिमुख अध्यापन आणि उद्योगाभिमुख कौशल्यविकासाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ‘सृजनकुंभ’ परिषद अत्यंत यशस्वी ठरली. ही परिषद विद्यार्थ्यांसाठी अत्यंत लाभदायक तर शिक्षकांसाठी ज्ञानवर्धक ठरल्याने सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.
या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण यांच्या शुभहस्ते झाले. वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची गरज आणि नव्या पिढीला नवोन्मेषाकडे वळविण्याचे महत्त्व त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून अधोरेखित केले. परिषदेच्या अध्यक्षस्थानी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष, पंचांगकर्ते व खगोलशास्त्रज्ञ होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी रुजविणे व ज्ञानपरंपरेचा आधुनिक तंत्रज्ञानाशी मेळ घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
समारोपप्रसंगी इस्रो तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक , तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक , तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत अभ्यासक्रम, कौशल्याधारित शिक्षण आणि शिक्षक-विद्यार्थी सहकार्य यावर मार्गदर्शन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) चे उपाध्यक्ष , राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद (NCVET) चे संचालक , राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) चे उपाध्यक्ष , कै. भास्करराव महाजन सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या अध्यक्षा , तसेच संस्थापक अध्यक्ष उपस्थित होते.
या परिषदेच्या निमित्ताने इंदाला अभियांत्रिकी महाविद्यालयात ड्रोन टेक्नॉलॉजी व अवकाश अन्वेषण या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्कृष्टता केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तांत्रिक अनुभव मिळावा, शिक्षकांना संशोधन व नवोन्मेषासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध व्हावे, तसेच उद्योग व शिक्षण क्षेत्रातील दरी कमी व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
परिषदेत एकाच छत्राखाली शैक्षणिक परिषद, विषयानुरूप सेमिनार, पोस्टर सादरीकरण, तंत्रप्रदर्शन, तज्ज्ञ मार्गदर्शन सत्र, स्पार्कथॉन आयडिया पिचिंग, ड्रोन, आयओटी (IoT) व 3D प्रिंटिंग कार्यशाळा अशा बहुआयामी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमांमध्ये शिक्षकांनी मार्गदर्शक व समन्वयक म्हणून सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांना संशोधन व स्टार्टअप संस्कृतीकडे प्रवृत्त केले. विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, संशोधक, स्टार्टअप्ससाठी आलेले परीक्षक, शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग परिषदेच्या यशात मोलाचा ठरला.
या यशस्वी आयोजनासाठी इंदाला अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन, फार्मसी व ITI येथील सर्व प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. शिक्षण, संशोधन व नवोन्मेष यांचा समन्वय साधणाऱ्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून आयोजन समितीचे समाधान व कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.
विद्यार्थी व शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता लक्षात घेता, मराठी विज्ञान परिषद – ठाणे विभागाच्या सहकार्याने ‘सृजनकुंभ’ परिषद दरवर्षी इंदाला कॅम्पस, बापसई, कल्याण येथे आयोजित केली जाईल, अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
‘सृजनकुंभ’ ही संकल्पना संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय महाजन यांच्या दूरदृष्टीतून साकार झाली असून, तंत्रज्ञान, नवोन्मेष, संशोधन आणि शिक्षक-विद्यार्थी सहकार्याला चालना देणारा हा उपक्रम भविष्यात शैक्षणिक क्षेत्रासाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत