याला म्हणतात नशीब! ठाकरेंची साथ सोडणाऱ्या महिला नेत्या बनणार मुंबईच्या महापौर?
याला म्हणतात नशीब! ठाकरेंची साथ सोडणाऱ्या महिला नेत्या बनणार मुंबईच्या महापौर?
लेवाजगत न्यूज | मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नसतानाच, महापौर पदाबाबत आता नवे राजकीय समीकरण पुढे येत आहे.
भाजप 89 जागांसह मुंबईतील सर्वात मोठा पक्ष ठरला असून, महायुतीला एकूण 116 जागा मिळाल्या आहेत. स्पष्ट बहुमत असलं तरी महापौर पदाची सोडत कोणत्या प्रवर्गासाठी निघते, यावर सर्वांचं लक्ष होतं.
महापौर पदाची सोडत सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव निघाल्याने भाजपमधील अनेक अनुभवी महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत. मात्र यातच एक नाव विशेष चर्चेत आलं आहे— तेजस्वी घोसाळकर.
एकेकाळी ठाकरेंच्या शिवसेनेत सक्रिय असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. दहिसरमधील वॉर्ड क्रमांक 2 मधून त्या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत. त्यांचे पती, शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा फेब्रुवारी 2024 मध्ये झालेला खून राज्यभर गाजला होता.
पतीच्या निधनानंतर तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई बँकेच्या संचालकपदीही निवड झाली. राजकीय अनुभव, सहानुभूतीचा घटक आणि भाजपमधील वाढता विश्वास पाहता, महापौर पदासाठी त्यांचं नाव आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा आहे.
भाजप आपल्या ‘धक्कातंत्रा’साठी ओळखला जातो. त्यामुळे अंतिम क्षणी चर्चेत नसलेला चेहराही महापौर बनू शकतो. मात्र, ठाकरेंची साथ सोडून गेलेल्या नेत्या जर मुंबईच्या पहिल्या नागरिक बनल्या, तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा टर्निंग पॉईंट ठरेल, यात शंका नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत