पूर्व विदर्भातील झाडीपट्टी नाट्यकलावंतांचा नागपुरात भव्य पुरस्कार सोहळा
पूर्व विदर्भातील झाडीपट्टी नाट्यकलावंतांचा नागपुरात भव्य पुरस्कार सोहळा
लेवाजगत न्युज नागपूर:-
पूर्व विदर्भातील नागपूर येथे झाडीपट्टी नाट्य क्षेत्रातील १० ते १२ कलावंतांचा भव्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी राका जिल्हा संघटन सचिव राधेश्यामजी बररय्या यांनी आदरणीय माजी मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब तसेच गडचिरोली जिल्ह्याचे सहपालक मंत्री आशिषजी जैस्वाल साहेब यांच्याकडे निधीची मागणी केली होती.
या मागणीला मान देत सर्व मान्यवरांनी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे झाडीपट्टी नाट्यसृष्टीतील कलावंतांमध्ये आनंदाचे वातावरण असून, राका जिल्हा संघटक राधेश्याम बररय्या यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) येथील झाडीपट्टी रंगभूमीवरील नाट्यकलावंतांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
पूर्व विदर्भ झाडीपट्टी नाट्यट्यकलावंत – पुरस्काराचे मानकरी
वर्षा संदीप राऊत – नाट्यकलावंत व नृत्य अभिनेत्री
वर्षा सोहन शुक्ला (गुप्ते)
सोनाली शार्दूल डोंगरे (निस्ताने)
मोसमी सुरेश दिवटे (गोंडाने)
ममता गोंगले
वनश्री शारधेय
प्रतिभा साखरे
मोसमी जांभुळकर
शिल्पा पाटील
पूनम दांगे
या पुरस्कार सोहळ्यामुळे झाडीपट्टी नाट्यकलावंतांना नवसंजीवनी मिळणार असून, पूर्व विदर्भातील नाट्यसृष्टी अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत