डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात पायरेक्सीया २०२६ चा थाटात शुभारंभ
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात पायरेक्सीया २०२६ चा थाटात शुभारंभ
केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसेंच्या हस्ते उद्घाटन ; पाच दिवस विविध स्पर्धा
लेवाजगत न्युज जळगाव :- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिरथ बॅचतर्फे आयोजित ‘पायरेक्सिया 2K26’ या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचा मंगळवारी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते थाटात शुभारंभ करण्यात आला.
दि. २७ ते ३१ जानेवारी या कालावधीत आयोजित या स्पर्धांमध्ये व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन आणि फुटसल अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडावृत्ती, संघभावना व शारीरिक तंदुरुस्ती वाढवणे हा या स्पर्धांचा मुख्य उद्देश आहे.
उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे चेअरमन, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, वैद्यकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, डॉ. वैभव पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, डॉक्टर व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत