रावेर तालुक्यातील विकासपुरुष मार्तंड भिरूड यांचे वृद्धापकाळाने निधन
रावेर तालुक्यातील विकासपुरुष मार्तंड भिरूड यांचे वृद्धापकाळाने निधन
लेवाजगत न्यूज जळगाव : रावेर तालुक्यातील विविध संस्थांवर कार्यरत आणि प्रगतीशील शेतकरी मार्तंड गणपत भिरुड यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९५ व्या वर्षी रविवारी दि. ४ जानेवारी रोजी संध्याकाळी उपचारादरम्यान निधन झाले. रावेरच्या विविध क्षेत्रातील शाश्वत विकासामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.
रावेर येथील खरेदी विक्री संघाचे ते ४० वर्षांपासून चेअरमन व संचालक राहिले आहे. खडका सूतगिरणीचे ते १५ वर्षे संचालक होते. तसेच मधुकर साखर कारखान्याचे संस्थापक संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. फैजपूर येथील जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ते संस्थापक संचालक आणि विद्यमान उपाध्यक्ष होते. धनाजी नाना चौधरी संस्थेचे महाविद्यालय, फैजपूर येथे संचालक होते.
जळगावच्या एज्युकेशनल युनियनच्या स्थापनेमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. तसेच वीस वर्षे ते संचालक राहिले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी चंद्रप्रभा भिरुड, मुले दीपक, डॉ. किरण, मुलगी ज्योती फालक, नातू डॉ. सौरभ यांच्यासह मोठा परिवार आहे. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांचे ते काका होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत