Contact Banner

रोहित-विराट पुन्हा मैदानात; भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेचा थरार वडोदऱ्यात


रोहित-विराट पुन्हा मैदानात; भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेचा थरार वडोदऱ्यात

लेवाजगत न्युज वडोदरा :-
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसह नव्या वर्षाची दमदार सुरुवात करत आहे. विशेष म्हणजे माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी मैदानात उतरणार असल्याने या मालिकेबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना वडोदरा येथील बीसीए (BCA) स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १ वाजता दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील, तर दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सामन्याचा पहिला चेंडू टाकला जाईल.

सामना कुठे पाहता येणार?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील हा पहिला वनडे सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. तसेच क्रिकेट चाहत्यांना जिओ हॉटस्टार अ‍ॅप आणि वेबसाईटवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे सामन्याचा आनंद घेता येणार आहे.

भारत-न्यूझीलंड वनडे हेड-टू-हेड रेकॉर्ड

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण १२० वनडे सामने खेळवण्यात आले आहेत.

  • भारताने ६२ सामने जिंकले आहेत

  • न्यूझीलंडने ५० सामन्यांत विजय मिळवला आहे

  • ७ सामने अनिर्णित राहिले असून

  • १ सामना बरोबरीत सुटला आहे

भारतीय भूमीवर भारताने १४ सामने जिंकले, तर न्यूझीलंडला भारतात केवळ ८ विजय मिळवता आले आहेत. तटस्थ मैदानांवर भारताने १७, तर न्यूझीलंडने १६ सामने जिंकले आहेत.

आकडेवारीनुसार टीम इंडियाचा वरचष्मा दिसून येतो, मात्र न्यूझीलंड संघाने नेहमीच भारतीय संघाला तगडी झुंज दिली आहे. त्यामुळे ही द्विपक्षीय वनडे मालिका चुरशीची आणि रोमांचक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.