Contact Banner

युवकांनी आत्म स्वावलंबनातून ग्राम स्वावलंबन करावे - कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत

 

yuvakanni-atma-swalambanatun-gram-swalamban-karyave-captain-dr-rajendra-rajput


युवकांनी आत्म स्वावलंबनातून ग्राम स्वावलंबन करावे - कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत


लेवाजगत न्यूज फैजपूर -युवक फक्त वयाने नाही तर त्यांच्यातील सकारात्मक उत्साह, जोश, देहशक्ती मधून आत्मबळ व स्वतःमधील ज्ञान, कौशल्य विकसनातून परिवार, समाज व देशाला सकारात्मकता देणारी ऊर्जा असून युवकांमधील आत्म स्वावलंबनातून ग्राम स्वावलंबन सहज शक्य असल्याचे प्रतिपादन धनाजी नाना महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी प्रोफेसर कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले.

ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने आयोजित सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिराच्या चौथ्या दिवशी बौद्धिक सत्रात बोलत होते.

 महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी *युवकांचा सहभाग* : *गाव स्वावलंबनाकडे* या विषयावर स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. युवकांच्या सक्रिय सहभागातून गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळू शकते, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. स्वयंसेवकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य करावे, असे आवाहन ही त्यांनी केले.

यावेळी महाविद्यालयातील प्रा डॉ. शरद बि-हाडे, प्रा. डॉ ईश्वर ठाकूर, प्रा. विजय तायडे, प्रा. पंकज बोदडे, प्रा. धिरज खैरे, प्रा. निलेश पाटील, प्रा. वाघुळदे व प्रा. गाढे यांनी शिबिराला सदिच्छा भेट दिली. त्यांच्या उपस्थितीमुळे स्वयंसेवकांचा उत्साह अधिकच वाढला.

शिबिराच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून स्वयंसेवकांचा सहभाग उल्लेखनीय असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे, कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ सतीश पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ विकास वाघुळदे, महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ सविता वाघमारे (कलवले) यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी परिश्रम घेत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.