विद्यार्थ्यांनो सावधान! देशभरात 32 बनावट विद्यापीठे; महाराष्ट्रातील 2 संस्थांचा समावेश
विद्यार्थ्यांनो सावधान! देशभरात 32 बनावट विद्यापीठे; महाराष्ट्रातील 2 संस्थांचा समावेश
लेवाजगत न्युज | मुंबई:
देशभरातील उच्च शिक्षण व्यवस्थेत धक्कादायक बाब समोर आली असून विद्यापीठ अनुदान आयोग (UGC)ने 32 विद्यापीठे बनावट असल्याचे जाहीर केले आहे. या यादीत महाराष्ट्रातील दोन संस्थांचा समावेश असून नागपूर येथील ‘राजा अरेबिक विद्यापीठ’ आणि सोलापूर येथील ‘नॅशनल बॅकवर्ड कृषी विद्यापीठ’ या संस्थांना कोणतीही कायदेशीर मान्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यूजीसीने दिलेल्या माहितीनुसार, या संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या पदव्या नोकरी किंवा पुढील शिक्षणासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित विद्यापीठाची मान्यता यूजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या यादीत सर्वाधिक 12 बनावट विद्यापीठे दिल्लीत आढळली असून उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरी, पश्चिम बंगाल आदी राज्यांतही अशा संस्थांचा समावेश आहे. आकर्षक नाव आणि जलद पदवीच्या आमिषाला बळी पडल्यास विद्यार्थ्यांचे वर्ष आणि पैसा दोन्ही वाया जाऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.
राज्यानुसार बनावट विद्यापीठे:
दिल्ली – 12
उत्तर प्रदेश – 4
आंध्र प्रदेश – 2
कर्नाटक – 2
केरळ – 2
महाराष्ट्र – 2
पुद्दुचेरी – 2
पश्चिम बंगाल – 2
अरुणाचल प्रदेश – 1
हरियाणा – 1
झारखंड – 1
राजस्थान – 1

कोणत्याही टिप्पण्या नाहीत