Contact Banner

माजी नगरसेवक शेरखा चाँदखा तडवी यांचे निधन

 

maji-nagarsevak-sherkha-chandkha-tadvi-yanchya-nidhan

माजी नगरसेवक शेरखा चाँदखा तडवी यांचे निधन

सावदा लेवाजगत प्रतिनिधी

सावदा शहरातील काजीपुरा परिसरातील रहिवासी तथा सावदा नगरपालिकेचे माजी नगरसेवक शेरखा चाँदखा तडवी वय 68 यांचे आज सोमवार, दि. 23 रोजी सकाळी 8 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सावदा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांची अंत्ययात्रा आज दि. 23 रोजसोमवार दुपारी 4 वाजता काजीपुरा येथील राहत्या घरापासून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी 4 भाऊ, 2 बहिणी, 3 मुले व 4 मुली असा मोठा परिवार आहे. मुराद शेरखा, हसन शेरखा व जावेद शेरखा यांचे ते वडील होत. तसेच माजी उपनगराध्यक्ष शबाना मुराद तडवी यांचे ते सासरे होत. रमजान चाँदखा व सलीम चाँदखा यांचे ते भाऊ तर नवाज रमजान तडवी यांचे मोठे बाबा होत.

त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली असून विविध स्तरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.