Contact Banner

धुळे जिल्ह्यात साखरपुड्यातील वादातून तिघांचा खून; आरोपी गुजरात सीमेवर अटकेत

 

dhule-jilhyat-sakharpudyatil-vadatun-tighancha-khun-aropi-gujarat-semevar-atket

धुळे जिल्ह्यात साखरपुड्यातील वादातून तिघांचा खून; आरोपी गुजरात सीमेवर अटकेत

लेवाजगत न्यूज धुळे — साखरपुड्याच्या कार्यक्रमात झालेल्या वादातून तिघांचा खून झाल्याची धक्कादायक घटना परिसरातील घोडेमाळ (ता. ) येथे घडली. एकाच समाजातील भाऊबंदांमधील जुना वाद उफाळून आल्याने मंडपातच मारामारी झाली आणि त्यात तिघांचा मृत्यू झाला. घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शांतता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९ रोजी दुपारी पिंपळनेर शिवारातील घोडेमाळ येथे विजू गोसावी यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यापूर्वी साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी दोन गटांत वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या मारामारीत सुरेश गोसावी (५०), साहिल गोसावी (३५) आणि देवेंद्र पवार (३६) यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.

आरोपी घाटात अटकेत

घटनेनंतर संशयित आरोपी ब्रेझा कारमधून गुजरातच्या दिशेने पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पिंपळनेर पोलिसांनी तात्काळ हालचाल करून घाट परिसरात स्थानिक नागरिकांना वाहन क्रमांक कळवला. गुजरात सीमेवरील ओटाबारी घाटात वाहतूक कोंडी निर्माण करून संबंधित वाहन अडवण्यात आले आणि तिघांना ताब्यात घेण्यात आले.

कांतीलाल गोसावी (४२), जसवंत गोसावी (३६) तसेच चालक अशी आरोपींची नावे असून ते सर्व येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना पोलिस ताब्यात ठेवण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, जुने कौटुंबिक व आर्थिक मतभेद हे वादामागील कारण असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

चिथावणीखोर स्टेटसवरून हल्ला

मोबाईलवर चिथावणीखोर स्टेटस ठेवल्याचा जाब विचारल्याने वर्‍हाडी मंडळींकडून वधू पक्षातील लोकांवर चाकूने वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची सखोल चौकशी सुरू

पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवणे, पुरावे संकलित करणे आणि आरोपींविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिला. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.