Contact Banner

डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

 


dr-gunvantrao-sarode-ayurved-mahavidyalayat-shivjayanticha-jallosh


डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात शिवजयंतीचा जल्लोष

लेवाजगत न्यूज जळगाव – येथील गोदावरी फाउंडेशन संचलित येथे यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराजांचे पूजन करण्यात आले.

यावेळी डीन डॉ. हर्षल बोरोले, डॉ. उमाकांत चौधरी, डॉ. सौगदकुमार तायडे, डॉ. प्रशांत मोरे, डॉ. रूपाली चौधरी, डॉ. चेतनकुमार पाटील, डॉ. मुकेश चौधरी, डॉ. साजीया खान, रजिस्ट्रार चेतन चौधरी तसेच मोहित येवले उपस्थित होते.

यानंतर महाविद्यालय परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. शिवाजी महाराजांची वेशभूषा महेश मछले यांनी साकारली. पुढे शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करण्यात आली तसेच नृत्यप्रस्तुतीही सादर झाली.

कार्यक्रमाचे व्यवस्थापन सौरभ मराठे, वेदांत चव्हाण आणि नेहल चौधरी यांनी केले. परिणीता पेठे व चेतना शिंदे यांनी नृत्य सादर केले, तर नाटिकेत आशिष तायडे, श्रुती उमाळे आणि रिद्धी जैस्वाल यांनी भूमिका साकारल्या. सूत्रसंचालन कौस्तुभ वडगावकर आणि रांजली इंगळे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.