ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी दिल्लीत विराट महामोर्चा; जळगावातून हजारो कार्यकर्त्यांचा एल्गार
ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी दिल्लीत विराट महामोर्चा; जळगावातून हजारो कार्यकर्त्यांचा एल्गार
जळगाव (विशेष प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या जनगणना धोरणात ओबीसी समाजाची झालेली उपेक्षा आणि प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर देशपातळीवर संघर्षाची ठिणगी पडली आहे. चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रीय महासचिव यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या सोमवार, २३ मार्च २०२६ रोजी येथील येथे भव्य देशव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनात जळगाव जिल्ह्याचा आवाज बुलंद करण्यासाठी जिल्हाध्यक्ष आणि जळगाव तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील मोठी फळी दिल्लीत धडकणार आहे.
राजपत्रातील त्रुटींवरून संताप
महासचिव सचिन राजूरकर यांच्या माहितीनुसार केंद्र सरकारने जनगणनेसाठी जाहीर केलेल्या ३३ सूचींमध्ये अनुसूचित जाती-जमातींचा उल्लेख आहे; मात्र ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना स्पष्ट नसल्याने समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ही तांत्रिक त्रुटी दुरुस्त करून तात्काळ जातिनिहाय जनगणना करावी, ही आंदोलनाची प्रमुख मागणी राहणार आहे.
जळगाव जिल्ह्याची जोरदार तयारी
जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ चौधरी यांनी सांगितले की, डॉ. बबनराव तायवाडे यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्याची “वज्रमूठ” तयार असून जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून समाजबांधव आपल्या हक्कासाठी दिल्लीत एकत्र येणार आहेत. स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना आणि क्रीमीलेअर मर्यादा वाढवण्याबाबत ठोस निर्णय होईपर्यंत संघर्ष सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
तालुकाध्यक्ष मनोज नाले सध्या तालुकानिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांची फळी उभी करत आहेत. “जळगाव तालुक्यातील प्रत्येक गावातून ओबीसी तरुणांचा सहभाग असणार आहे. ‘चलो दिल्ली’चा नारा देत मोठ्या संख्येने जंतर-मंतरवर पोहोचावे,” असे आवाहन त्यांनी केले.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या
- जातिनिहाय जनगणना – जनगणना अर्जात ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना असावा.
- स्वतंत्र मंत्रालय – केंद्र स्तरावर ओबीसी कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना.
- शिक्षण हक्क – प्रलंबित UGC विधेयक तात्काळ लागू करून विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करणे.
- क्रीमीलेअर मर्यादा – महागाईनुसार उत्पन्न मर्यादा वाढवणे.
देशव्यापी एकजूट
तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातील विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. २३ मार्च रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत होणाऱ्या या आंदोलनातून दिल्लीत ओबीसींच्या संघटित शक्तीचे दर्शन घडणार असून जिल्ह्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत