Contact Banner

डॉ.उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

 

dr-ulhas-patil-physiotherapy-mahavidyalayat-shivjayanti-utsahat-sajri

डॉ.उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

लेवाजगत न्यूज जळगाव – येथील येथे यांची जयंती उत्साहपूर्ण व भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

यानंतर प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी तसेच अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.

कार्यक्रमात प्रथम वर्षाचा विद्यार्थी सुमित काकडे याने सादर केलेल्या जोशपूर्ण पोवाड्यातून शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचे प्रभावी चित्रण केले. त्यानंतर भूषण नामदेव याने दिलेल्या दमदार घोषणांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

हा कार्यक्रम विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी आणि डॉ. अमित जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. यावेळी शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.