Contact Banner

डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत क्रीडा महोत्सवाचा जल्लोषात समारोप

 


डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत क्रीडा महोत्सवाचा जल्लोषात समारोप

जळगाव : येथे आयोजित तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे दर्शन घडवले असून स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करून गौरविण्यात आले. महिला क्रिकेट स्पर्धेत आराघ्या संघ विजयी ठरला असून भारती जगताप, श्रुती गेडाम, गौरी कुंभाळकर, तिलोत्तमा चौधरी, समीक्षा गोपाळ, तृप्ती पाटील, श्रद्धा भुतडा, ऋतुजा लोखंडे, हृतुजा इंगळे, आचल व निशा उईके यांचा संघात समावेश होता. पुरुष क्रिकेट स्पर्धेत रिसेन संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद मिळवले असून नईम तडवी, ओम चौधरी, चंदन मौर्या, नौमान मुस्तफिज, हमजा सिद्दीकी, प्रणव मुखेडकर, आदित्य बच्छाव, रोहित मारू, प्रफुल पंचोदबरिया, जीत खत्री, फहीम खान व झैद शेख यांनी संघाचे प्रतिनिधित्व केले. खो-खो स्पर्धेतही रिसेन संघ विजयी ठरला असून दिव्या विशे, पूजा दानवे, सायली शेलके, साक्षी इंगळे, साक्षी खोंडले, तनिषा पवार, सानिका लाखोटिया, वैष्णवी सावंत व मिसबह यांनी उत्कृष्ट खेळ सादर केला. गोळाफेक स्पर्धेत मुली गटात खुशी अर्जपुरे (५.४ मीटर) प्रथम, ट्विंकल माळी (५.२ मीटर) द्वितीय व वैष्णवी गुट्टे (५.१ मीटर) तृतीय ठरल्या, तर मुले गटात युवराज पाटील (८.२ मीटर) प्रथम, अंकित राऊत (८ मीटर) द्वितीय व गणेश दुधाभाते (७.७ मीटर) तृतीय ठरले. बॅडमिंटन स्पर्धेत भारती शेजुळ व ट्विंकल माळी या जोडीने विजेतेपद पटकावले, तर समृद्धी व खुशी जोगे या जोडीने उपविजेतेपद मिळवले. या क्रीडा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, संघभावना व आत्मविश्वास वृद्धिंगत झाल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.