Contact Banner

नशिराबादमध्ये २२ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

 


नशिराबादमध्ये २२ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

परिसरात हळहळ ; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

लेवाजगत न्युज नशिराबाद:-

नशिराबाद येथील पेठ भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील २२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी उघडकीस आली. शुभम सुनील माळी (वय २२, रा. नशिराबाद पेठ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, गेल्या दोन दिवसांपासून शुभमचे आई-वडील व भाऊ काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. आज सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास कुटुंबीय घरी परतले असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वारंवार दरवाजा ठोठावूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून घरात प्रवेश करण्यात आला.

घरात प्रवेश करताच शुभम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ उपचारासाठी जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून, आज सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.