Contact Banner

कंठवली येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न

 

kanthavali-yethe-shri-dnyaneshwari-parayan-sohala-sampann

कंठवली येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न

उरण : सुनिल ठाकूर

उरण तालुक्यातील कंठवली येथील श्री हनुमान मंदिरात शनिवार, दिनांक २ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भक्तिभावात पार पडला. श्री हनुमान मंदिर विश्वस्त व ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने ह.भ.प. एकनाथ महाराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सप्ताहाच्या कालावधीत दररोज पहाटे ४ ते ६.३० काकड आरती, सकाळी ७.३० ते १२.३० ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ३ ते ४.३० पारायण, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन, ६ ते ७ हरिपाठ तसेच रात्री ७.३० ते ९.३० हरिकीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

या प्रसंगी ह.भ.प. दिगंबर महाराज राऊत (पेण), संत चरण सौ. संगीता ताई कठोले (वाडा, पालघर), ह.भ.प. विक्रांत महाराज पेडीकर (आळंदी), ह.भ.प. निवृत्ती महाराज पाटील (उसाटणे) व आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री (मलंगड) यांच्या सुश्राव्य कीर्तनांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता दिंडी सोहळा व सायंकाळी ६ वाजता दीपोत्सव संपन्न झाला.

सोहळ्याची सांगता ह.भ.प. गणेश महाराज फुलकुंठवार (भिवंडी) यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री हनुमान मंदिर विश्वस्त व ग्रामस्थ मंडळ, कंठवली यांनी विशेष परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.