लेवा समाजातील साध्या पद्धतीने पार पडलेल्या विवाहाबद्दल दांपत्याचा सत्कार
साध्या पद्धतीने पार पडलेल्या विवाहाबद्दल दांपत्याचा सत्कार
लेवाजगत न्यूज फैजपूर -लेवा समाजात आदर्श निर्माण करणारा एक सुंदर उपक्रम अलीकडेच पाहायला मिळाला. आपल्या मुलाच्या लग्नामध्ये संबंधित कुटुंबाने कोणताही डीजे किंवा बँड न लावता, तसेच आहेर, लाडू किंवा रुखवत न स्वीकारता विवाह सोहळा साध्या व टाईमशीर पद्धतीने पार पाडला. या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचून लेवा समाजामध्ये या कृतीचे मोठे कौतुक करण्यात आले.
या प्रेरणादायी कार्याबद्दल लेवा समाजाचे लाडके आमदार आदरणीय अमोलदादा जावळे यांच्या हस्ते संबंधित दांपत्याचा—त्यांच्या पत्नींसह श्री. धांडे साहेबांचा—सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी भूषण पुरस्कार विजेते आदरणीय नारायण बापू चौधरी तसेच भाजप ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख भरत महाजन उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांसह समाजातील नागरिकांनी या आदर्श उपक्रमाचे मनापासून अभिनंदन करून भविष्यातही अशा साध्या व सामाजिक भान जपणाऱ्या विवाह पद्धतींचा आदर्श घ्यावा, असे मत व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत