Contact Banner

संयुक्त कारवाईत मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या; दोन गुन्हे उघड

 

sanyukt-karvait-motarsaykal-chortyachya-musakya-avalya-don-gunhe-ughad

संयुक्त कारवाईत मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या; दोन गुन्हे उघड

लेवाजगत न्यूज भुसावळ : स्थानिक गुन्हे शाखा जळगाव आणि शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात येऊन दोन गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे.

दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी भुसावळ येथील कोर्ट आवारातून हिरोहोंडा कंपनीची एच.एफ. डिलक्स (क्र. एमएच-३९-टी-६१०२) ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने फिर्यादी अॅड. रोकडे यांच्या संमतीशिवाय चोरी करून नेली होती. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०९/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी बारबोले तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी किरण उर्फ करण शालीग्राम पाटील (रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव)यास चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले.

अटकेदरम्यान चौकशी केली असता आरोपीने येथील अलथान पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा क्रमांक ०८५/२०२६ मधील होंडा शाईन (क्र. जीजे-०५-एनए-६१८०) ही चोरीची मोटारसायकलही काढून दिली. आरोपी हा सराईत मोटारसायकल चोर असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी व भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हे.कॉ. उमाकांत पाटील, पो.कॉ. प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे तसेच भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. राहुल भंडारे, पो.कॉ. राहुल भोई आणि तालुका पोलीस स्टेशनचे पो.ना. नितीन चौधरी यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.