सावद्यात रेशन धान्याबाबत तक्रारींसाठी विशेष उपक्रम
सावद्यात रेशन धान्याबाबत तक्रारींसाठी विशेष उपक्रम
२ मार्चपर्यंत कागदपत्रांसह संपर्क करण्याचे आवाहन
सावदा (प्रतिनिधी) – सावदा शहरातील रेशन कार्डधारक व शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना रेशन धान्य वेळेवर न मिळणे, नावात त्रुटी असणे, धान्याचे प्रमाण कमी मिळणे तसेच इतर तांत्रिक अडचणींबाबत अनेक तक्रारी पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.
नागरिकांनी आपल्या रेशन कार्डची झेरॉक्स, त्यातील सर्व सदस्यांच्या आधार कार्डच्या झेरॉक्स प्रती तसेच संबंधित कागदपत्रांसह कु. सिमरन राजेश वानखेडे (नगरसेविका, सावदा) आणि सौ. सुभद्राबाई सिद्धार्थ बडगे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दि. २ मार्च २०२६ पर्यंत नागरिकांकडून अर्ज व कागदपत्रे स्वीकारण्यात येणार असून त्यानंतर संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या उपक्रमामागील उद्दिष्ट म्हणजे सावदा शहरातील कोणताही पात्र लाभार्थी शासनाच्या अन्नधान्य योजनेपासून वंचित राहू नये. नागरिकांनी वेळेत आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हा उपक्रम कु. सिमरन राजेश वानखेडे यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नगरसेविका व महिला आघाडीचे सहकार्य लाभत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत