यावल तालुक्यातील हिंगोणा येथे किरकोळ वादातून तरुणाची हत्या; परिसरात खळबळ
यावल तालुक्यातील हिंगोणा येथे किरकोळ वादातून तरुणाची हत्या; परिसरात खळबळ
लेवाजगत न्यूज फैजपूर -यावल तालुक्यातील हिंगोणा येथे किरकोळ वादातून एका १९ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव प्रथमेश मुकेश महाले (वय १९) असे असून, किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या प्रथमेशचा मृत्यू झाला.
या घटनेत रीना मोहित गजरे (वय १९), मोहित राजेंद्र गजरे (वय ३०) आणि निखिल राजेंद्र गजरे (वय २६) हे तिघेही चाकूच्या वारात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणातील संशयित आरोपी गौरव जाधव (रा. खर्डी, हल्ली मुक्काम हिंगोणा) याचे नाव समोर आले आहे. घटनेनंतर आरोपी फरार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत