Contact Banner

अंबरनाथ येथे महिला दिनानिमित्त उत्साहात कार्यक्रम; १०५ महिलांचा सहभाग

 

ambarnath-yethe-mahila-din-nimit-karyakram-105-mahilanchya-sahabhag


अंबरनाथ येथे महिला दिनानिमित्त उत्साहात कार्यक्रम; १०५ महिलांचा सहभाग

लेवाजगत न्यूज अंबरनाथ : युवा समिती भोरगाव लेवा पाटीदार पंचायत, अंबरनाथ शहर शाखा यांच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिन निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अंबरनाथ (पूर्व) येथील विरंगुळा सभागृह, कानसाई सेक्शन, सूर्योदय सोसायटी येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ, लकी ड्रॉ, आकर्षक बक्षिसे तसेच विशेष आकर्षण म्हणून केळीपासून बनवलेल्या पदार्थांची पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात सुमारे १०५ महिलांनी सहभाग घेतला होता. पाककला स्पर्धेत ११ महिलांनी सहभाग नोंदवला असून त्यामधील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

लकी ड्रॉमध्ये स्मार्ट वॉच, साड्या तसेच जवळपास ३२ आकर्षक बक्षिसे महिलांना देण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ शहराचे आमदार बालाजी किणीकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोरगाव लेवा पाटीदार पंचायत, मुंबई विभागाच्या सचिव सौ. भाग्यश्री पाचपांडे होत्या.

तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. प्रतिभा वराडे, सौ. दीप्ती म्हस्के देसाई, सौ. निलिमा रडे, सौ. संध्या म्हात्रे, सौ. अपर्णा भोईर, सौ. वसंती सरदेसाई उपस्थित होत्या.

महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्यासंदर्भात डॉ. स्वप्ना चौधरी यांनी मार्गदर्शन केले. तसेच कुमारी वैदेही भंगाळे (रायझिंग स्टार) हिने आपल्या मधुर आवाजात गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कुमारी प्रचिती वराडे हिने आकर्षक स्वागत नृत्य सादर केले.

यावेळी युवा समिती प्रमुख मयुरेश नरेंद्र कोल्हे यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल महिला कार्यकारिणीचे कौतुक केले. तसेच सौ. प्रतिभा वराडे यांनीही कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमासाठी प्रशांत पाटील (अध्यक्ष, अंबरनाथ शहर), सौ. स्मिता चौधरी (सचिव), नीलेश झांबरे (उपाध्यक्ष), किरण नेमाडे, चेतन चौधरी, लोकेश चौधरी, भूषण चौधरी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. स्मिता चौधरी, सौ. वैशाली पाटील, सौ. हर्षाली कोल्हे, सौ. भावना पाटील, सौ. रुपाली कोल्हे, सौ. वीणा काळे, सौ. वर्षा वराडे, प्रिया बोरले यांनी विशेष परिश्रम घेतले.

महिलांच्या मोठ्या सहभागामुळे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.