Contact Banner

शिवमहापुराण कथेनिमित्त दिनांक 10 ते 16 पर्यंत वाहतुकीत तात्पुरते बदल फैजपूर भुसावलं रोडवरील वाहतूक सकाळी 8 ते रात्री 7 वाजे पर्यंत बंद

  

shivmahapuran-kathe-nimit-vahatukit-tatpurte-badal-faizpur-bhusawal-road-sakali-8-te-ratri-7-band

शिवमहापुराण कथेनिमित्त दिनांक 10 ते 16 पर्यंत वाहतुकीत तात्पुरते बदल

फैजपूर भुसावलं रोडवरील वाहतूक सकाळी 8 ते रात्री 7 वाजे पर्यंत बंद 

लेवाजगत न्यूज फैजपूर (ता. यावल) : अकलुद शिवार परिसरात आयोजित करण्यात आलेल्या पंडित श्री प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेदरम्यान वाहतुकीची वाढती वर्दळ लक्षात घेता जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने तात्पुरते वाहतूक बदल लागू केले आहेत.

मंगळवार दि. १० मार्च २०२६ ते सोमवार दि. १६ मार्च २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ८.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळाजवळील मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. हा आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ (१) (बी) अंतर्गत जारी केला आहे.

कार्यक्रम भुसावळ–फैजपूर रोडवरील गुरुकृपा पेट्रोल पंपाच्या मागे, अकलुद शिवार येथे होत असून, त्या परिसरातील सर्व रस्ते व उपरस्त्यांवर वाहतुकीचे नियमन करण्यात येणार आहे.

वाहतुकीतील महत्त्वाचे बदल

• भुसावळ–फैजपूर रोडवरील हॉटेल रिव्हर पॉईंट ते भोरटेक फाटा दरम्यान सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील.

• भुसावळकडून फैजपूरकडे जाणारी वाहने (एसटी बस, कार, रिक्षा, दुचाकी) अकलुद जुना टोल नाका – यावल मार्गे वळविण्यात येतील. तसेच फैजपूरकडून भुसावळकडे जाणारी वाहने यावल टी-पॉईंट मार्गे तापी पुलावरून भुसावळकडे वळवली जातील.

• रावेर–सावदा–फैजपूर मार्गे भुसावळकडे जाणारी वाहने बनाना सिटी सावदा येथून हतनूर–बोहर्डी फाटा मार्गे वळविण्यात येतील.

• रावेर–सावदा–फैजपूर मार्गे येणारी अवजड वाहतूक (मालट्रक) यावल–किनगाव मार्गे जळगाव–भुसावळकडे वळविण्यात येईल.

• चोपडा–यावलहून भुसावळकडे जाणारी वाहने धानोरा फाटा (अडावद) येथून डांभुर्णी–जळगाव मार्गे वळवली जातील.

• भुसावळकडून तापी पुलावरून फैजपूरकडे येणारी अवजड वाहतूक जळगाव–डांभुर्णी–किनगाव–यावल मार्गे फैजपूरकडे वळविण्यात येईल.

पोलीस प्रशासनाने नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

 ही बातमी गरजू लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना जाण्याचा मार्ग सुकर होईल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.