अंबरनाथ येथिल कु. मानस झोपे (सीए) यांचा खान्देश सेनेतर्फे सत्कार
अंबरनाथ येथिल कु. मानस झोपे (सीए) यांचा खान्देश सेनेतर्फे सत्कार
लेवाजगत न्यूज अंबरनाथ | प्रतिनिधी : अंबरनाथ (कानसाई सेक्शन) येथील रहिवासी व आदर्श शिक्षक म्हणून ओळख असलेले अनिल झोपे सर यांचे सुपुत्र कु. मानस अनिल झोपे यांनी अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा खान्देश सेनेतर्फे सत्कार करण्यात आला.
खान्देश सेनेचे प्रमुख सुहासदादा बोंडे यांच्या हस्ते कु. मानस झोपे यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे ऐतिहासिक खान्देश तसेच लेवा पाटीदार समाज आणि अंबरनाथ शहराचे नाव उंचावल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
या सत्कार सोहळ्यास ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती एकनाथ शेठ म्हात्रे, खान्देश सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नितीन जावळे, भोरगाव लेवा पाटीदार पंचायत युवा समिती अंबरनाथचे अध्यक्ष प्रशांत पाटील, आदर्श शिक्षक अनिल झोपे, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व जागतिक कीर्तीच्या ब्युटीशियन वैशाली पाटील, आदिवासी बहुल भागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या कामिनी जावळे, मिनाक्षी झोपे मॅडम, राज्यस्तरीय आदिशक्ती पुरस्कार प्राप्त स्मिता चौधरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी कु. मानस झोपे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत