विद्यार्थ्यांनी नर्सिंग क्षेत्रात सेवाभाव जपण्याचा केला संकल्प लॅम्प लाईटिंग कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी घेतली प्रतिज्ञा
विद्यार्थ्यांनी नर्सिंग क्षेत्रात सेवाभाव जपण्याचा केला संकल्प
लॅम्प लाईटिंग कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी घेतली प्रतिज्ञा
जळगाव लेवाजगत न्यूज प्रतिनिधी : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग व डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने लॅम्प लाईटिंग व प्रतिज्ञा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात बी.एस्सी., जी.एन.एम. व ए.एन.एम. अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी नर्सिंग व्यवसायातील सेवाभाव, समर्पण व मानवतेची शपथ घेतली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय नर्सिंग महाविद्यालय, जीएमसी जळगावचे प्राचार्य डॉ. पुष्पेंद्र निकुम उपस्थित होते. तसेच गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी सचिव डॉ. वर्षा पाटील, डी.एम. कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, डॉ. प्रशांत सोलंकी आणि अधिष्ठाता डॉ. एन. एस. आर्वीकर उपस्थित होते.
कार्यक्रमात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य प्रा. विशाखा गानवीर तसेच डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य प्रा. शिवानंद बिरादार, उपप्राचार्य प्रा. प्रणिता गायकवाड व प्रा. जॅसिंथ धावा यांच्यासह प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन स्वराज बॅचच्या सहकार्याने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. मीनाव देवी, प्रा. प्रियंका जगताप, कॅलॉट लोंढे, सचिन पवार, साक्षी गायकवाड व मानसी ढोबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास व्यवस्थापन, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नर्सिंग क्षेत्रात सेवाभाव, करुणा आणि मानवतेची जपणूक करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत