Contact Banner

आमदार अमोल जावळे यांच्या पुढाकारातून यावलमध्ये मोतीबिंदू तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद १४६ रुग्णांची तपासणी; ४५ जणांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड

 

amdar-amol-javale-pudhakartutun-yaval-motibindu-tapasni-shibir-146-rugna-tapasni-45-mofat-shastrakriya-nivad

आमदार अमोल जावळे यांच्या पुढाकारातून यावलमध्ये मोतीबिंदू तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

१४६ रुग्णांची तपासणी; ४५ जणांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड

लेवाजगत  न्यूज यावल : ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांच्या आजारांवर वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळावेत, या उद्देशाने आमदार अमोल जावळे यांच्या पुढाकारातून यावल येथे आयोजित मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात एकूण १४६ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान मोतीबिंदूचा त्रास असलेल्या ४५ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्व रुग्णांची जळगाव येथे ने-आण, प्रवास तसेच इतर आवश्यक खर्चाची जबाबदारी आमदार अमोल जावळे यांनी स्वीकारली आहे. या रुग्णांवर दि. २६ मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी), जळगाव येथे पूर्णतः विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

शिबिरात जळगाव येथील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने रुग्णांची बारकाईने तपासणी केली. यामध्ये डॉ. विजय कुरकुरे, डॉ. तुषार सोनवणे आणि डॉ. अनंत लांडगे यांनी मोलाची सेवा बजावली. तसेच शिवाजी पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना आमदार अमोल जावळे म्हणाले, “ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः मोतीबिंदूसारखे डोळ्यांचे विकार वयोवृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यामुळे अशा आरोग्य शिबिरांद्वारे तपासणी व शस्त्रक्रिया करून रुग्णांना दिलासा देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहील.”

या प्रसंगी भाजपा गटनेता नंदा महाजन, नगरसेवक उमेश फेगडे, हेमराज हेगडे, कल्पनाताई वाणी, रुबाब तडवी, योगेश चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष सागर कोळी, भरत पाटील, संदीप सोनवणे, विष्णू पारधे, वीर येवले, मुकेश कोळी, उज्वल कानडे, हेमंत चौधरी, डॉ. निलेश गडे, रितेश बारी, चेतन आढळकर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.