Contact Banner

आमोदा येथे श्रीराम मंदिर पुनर्निर्माणासाठी भव्य भूमिपूजन सोहळा; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

 

amoda-yethe-shriram-mandir-punarnirmanasathi-bhavya-bhumipujan-sohala-gramasthacha-utsphurt-sahabhag


आमोदा येथे श्रीराम मंदिर पुनर्निर्माणासाठी भव्य भूमिपूजन सोहळा; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

आमोदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) – आमोदा तालुका यावल गावातील श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी आज संतांच्या पवित्र उपस्थितीत भव्य भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यामुळे संपूर्ण गावात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली श्रद्धा व्यक्त केली.

माहितीनुसार, दिनांक २ मे २०२५ रोजी मंदिराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या जिल्हा बँक शाखेत शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली होती. या आगीत श्रीराम मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत असतानाच मंदिराचे पुनर्निर्माण करण्याचा ठाम निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता. त्यानुसार आज या पुनर्निर्माण कार्याची विधिवत सुरुवात करण्यात आली.

आज सकाळी पार पडलेल्या या सोहळ्यात महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांच्या हस्ते मंत्रोच्चारात भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आचार्य स्वरूपानंद महाराज,शास्त्री अनंत प्रकाश दास ,धनराज महाराज ,महामंडलेश्वर पवन दास महाराज , महंत कन्हैया दास महाराज , आचार्य मानेकर बाबा हजर होते .यावेळी जनार्दन महाराज यांनी सांगितले  पुरुषार्थ हाच हिंदू धर्म आहे . मंदिर नवीन व्हावे ही देवाची इच्छा होती .आमोदयाचा  सौंदर्य वाढवण्यासाठी हे मंदीर महत्त्वाचे ठरणार आहे .त्यासाठी भव्य असे मंदिर तयार करा .संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. वेदघोष, मंत्रोच्चार आणि जय श्रीरामच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

या धार्मिक विधीत गावातील पाच जोडप्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सचिन चौधरी, कुंदन पाटील, नयन चौधरी, सचिन लोखंडे आणि ललित चौधरी या मान्यवरांच्या हस्ते पूजा-अर्चा करण्यात आली. या सर्वांनी श्रद्धेने आणि भक्तिभावाने विधी पूर्ण केला.

कार्यक्रमाला लेवा श्रीराम ट्रस्ट चेअरमन उमेश पाटील सेक्रेटरी महेंद्र सरोदे ,विश्वस्त मोहन लोखंडे ,राजेंद्र पाटील , ललित महाजन ,धनराज चौधरी,सचिन चौधरी , मिठाराम सरोदे ,सुरेश महाजन , संदीप चौधरी , डिगंबर भारंबे, यांच्यासह गावातील मान्यवर, ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिराच्या पुनर्निर्माणामुळे गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि एकजुटीने मंदिराचे भव्य स्वरूपात पुनर्निर्माण करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमामुळे गावात एकात्मता आणि श्रद्धेचे सुंदर उदाहरण पाहायला मिळत असून, आगामी काळात श्रीराम मंदिर पुन्हा एकदा भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.