Contact Banner

“तू माझी प्रेयसी बनली नाही तर…”; भोंदू बाबाचा विकृत खेळ उघडकीस

  

tu-maji-preyasi-banli-nahi-tar-bhondu-babacha-vikrut-khel-ughadkis


“तू माझी प्रेयसी बनली नाही तर…”; भोंदू बाबाचा विकृत खेळ उघडकीस

नाशिक : मंत्र-तंत्र आणि दैवी शक्तींचा दावा करत महिलेला जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात संशयित अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

तक्रारीनुसार, नोव्हेंबर २०२२ मध्ये पीडिता कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात धार्मिक विधीबाबत चर्चा करण्यासाठी एकटी गेली होती. यावेळी आरोपीने तिला चेंबरमध्ये बोलावून प्रसाद म्हणून पेढा दिला आणि तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजले. यानंतर पीडितेला गुंगी येऊन डोके जड झाल्याचा आरोप आहे.

या अवस्थेचा फायदा घेत आरोपीने तिच्याशी जवळीक साधत, “तू माझी प्रेयसी बनली नाही तर तुझ्यावर परमेश्वराचा कोप होईल आणि तुझा नवरा मृत्युमुखी पडेल,” अशी भीती दाखवली. तसेच “मी तुला पवित्र करीत आहे,” असे सांगत जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

विश्वास संपादन करून फसवणूक

पीडितेची आणि आरोपीची ओळख २०१९ मध्ये झाली होती. त्या वेळी आरोपीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत, “तुझे लग्न श्रीमंत घराण्यात होईल, करिअर घडेल,” असे सांगून तिचा विश्वास जिंकला.

यानंतर २०२१ मध्ये साखरपुडा मोडल्यानंतरही आरोपीने तिला धीर देत ५० हजार रुपये घेऊन ‘पुष्कराज’ खडा दिला. तो ‘सिद्ध’ असल्याचे सांगून गळ्यात घालण्याचा सल्ला दिला.

पुन्हा अत्याचाराचा आरोप

२०२२ मध्ये पीडितेचे लग्न ठरल्यानंतर आरोपीने तिला आणि तिच्या पतीला आशीर्वादासाठी कार्यालयात बोलावले. मात्र, त्याच पद्धतीने पुन्हा गुंगी आणून अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.