Contact Banner

भवानी फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिरात 147 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

bhavani-foundation-raktdan-shibirat-147-raktdatyancha-utsphurt-sahabhag

भवानी फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिरात 147 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

उरण लेवाजगत न्यूज प्रतिनिधी 

भवानी फाऊंडेशनच्या वतीने एमजीएम कामोठे हॉस्पिटलच्या सहकार्याने शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या 25 व्या रक्तदान शिबिरात तब्बल 147 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले.

सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष के. डी. शेट्टी, संचालक जिक्षित शेट्टी, शिखा शेट्टी, सरीता शेट्टी, प्रियांका शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. यापूर्वी आयोजित विविध रक्तदान शिबिरांमधून चार हजारांहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची नोंद आहे.

नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूर येथील व्ही-टाईम्स स्क्वेअर, सेक्टर-15 येथे पार पडलेल्या या शिबिराला मान्यवरांची उपस्थिती लाभली. अपोलो हॉस्पिटलचे प्रख्यात सर्जन डॉ. नितीश झवर, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) शहरप्रमुख हरीष इंगळे, स्माईल फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती उमा आहुजा तसेच नेक्स्ट इन्फ्राटेक सोल्युशनचे संस्थापक व एमडी सत्या बाबू नायडू आदी मान्यवरांनी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले.

परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत 147 जणांनी रक्तदान केल्याची माहिती भवानी फाऊंडेशनचे संचालक नवीन शेट्टी यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.