Contact Banner

जुना वाद जीवावर बेतला; जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

 

juna-vad-jivavar-betla-jakhmi-tarunacha-upcharadarmyan-mrityu

जुना वाद जीवावर बेतला; जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) – रविवारी (दि. २२ मार्च) झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील जैनाबाद परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली होती. नितीन नाना काळे या तरुणावर शाम तुकाराम सूर्यवंशी याने धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात नितीन काळे गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, उपचार सुरू असतानाच आज पहाटे नितीन काळे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत नितीन काळे यांच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, नितीन आणि आरोपी शाम सूर्यवंशी यांच्यात जुना वाद होता. संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून रविवारी त्याची तारीख होती. या वादात तडजोड करण्याच्या बहाण्याने सूर्यवंशी याने नितीनला गोड बोलून सोबत नेले. त्यानंतर त्याला मद्य पाजून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नितीन काळे हा गोवा येथे नोकरीस असून तो अधूनमधून जळगावला येत होता. न्यायालयीन कामानिमित्त तो सध्या गावी आला असताना त्याच्यावर हल्ला होऊन त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.