Contact Banner

सकल राजपूत प्राध्यापक परिवाराच्या वतीने राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाचे आयोजन


sakal-rajput-pradhyapak-parivar-watine-rajyastariya-shaikshanik-sammelan-ayojan


 सकल राजपूत प्राध्यापक परिवाराच्या वतीने राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) – सकल राजपूत प्राध्यापक परिवाराच्या वतीने वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाचे द्वितीय आयोजन रविवार, दि. २२ मार्च रोजी सुवर्णनगरी जळगाव येथील वलयांकित श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलीटेक्निक येथे करण्यात आले आहे.

या संमेलनात महाराष्ट्रातील विविध महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये कार्यरत तसेच सेवानिवृत्त वरिष्ठ प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. उद्घाटन सत्राचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार रावसाहेब शेखावत (अमरावती) उपस्थित राहणार असून, उद्घाटन जैन इरिगेशन सिस्टीमचे व्हाइस प्रेसिडेंट व जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. के. बी. पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

यापूर्वी, दि. ९ मार्च २०२५ रोजी संत नगरी शेगाव येथे या संमेलनाचे पहिले आयोजन यशस्वीरीत्या पार पडले होते. समाजातील बुद्धिजीवी व प्रगत प्राध्यापक वर्गाच्या माध्यमातून समाज संघटन, समाज उभारणी आणि विविध सामाजिक उपक्रमांना दिशा देण्याच्या उद्देशाने या संमेलनांचे आयोजन करण्यात येते.

संमेलनात “राजपुतांचा समृद्ध इतिहास” या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते व लेखक डॉ. नरसिंह परदेशी यांचे दृकश्राव्य सादरीकरण होणार आहे. त्यानंतर विविध सत्रांमधून व्यक्ती व कुटुंब परिचय, समाज संघटनाची बांधणी तसेच भविष्यकालीन दिशा यावर सखोल विचारमंथन करण्यात येणार आहे.

या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सकल राजपूत प्राध्यापक परिवाराची आयोजन समिती विशेष परिश्रम घेत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.