Contact Banner

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

dr-ulhas-patil-vaidkiya-mahavidyalay-rugnalayat-3-4-5-april-tiralepanasathi-mofat-shastrakriya-shibir


डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर  

जळगाव (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) - डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान पुणे, व यांच्या संयुक्त विद्यमाने ३,४ आणि ५ एप्रिल रोजी मोफत तिरळेपणा व पडलेल्या पापणीवरील शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात या शस्त्रक्रिया होणार आहे.  योजनेअंतर्गत मोफत तपासणी, शस्त्रक्रिया औषधी तसेच जेवण व राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे.  सलग तिन दिवस १०० रूग्णांवर या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. दि १,२ आणि ३ एप्रिल रोजी नोंदणी झालेल्या रूग्णांची तपासणी केली जाणार आहे.यानंतर ३ ते ५ एप्रिल गरजू रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील.

अशी आहे तज्ञांची टीम

यासाठी सलग तिन वेळा लिम्का बुक,आशिया, आणि इंडिया बुक रेकॉर्ड सह विविध पुरस्कार प्राप्त तसेच २०० पेक्षा जास्त तिरळेपणा शिबिर राबवणारे पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान प्रमुख नेत्र तज्ज्ञ व अध्यक्ष, डॉ मधुसूदन झंवर सचिव व प्रमुख सर्जन डॉ राजेश पवार, ओकुलोप्लास्ति सर्जन डॉ रमेश भांगे, प्रमुख भूलतज्ञ डॉ श्यामकांत कुलकर्णी प्रमुख संयोजक डॉ वैभव वनारसे,हे उपस्थीत राहणार असून डॉ सचिन गाडे,डॉ संजीव राठोड,डॉ आनंद खडके,डॉ मनोज भायगुडे,डॉ ललित शहा, डॉ प्रवीण जगताप, डॉ सचिन बगाडे, डॉ उदय. कुरुडकर,डॉ अनिल वायकुळे,डॉ राजेंद्र लोहारे,डॉ नितीन भालेराव,डॉ रवी देशमुख,भूलतज्ञ डॉ राजेंद्र जाधव, डॉ.बंदल ही तज्ञांची टीम त्यांना सहकार्य करणार आहे. 

रूग्णासाठी महत्वाचे कागदपत्रे

 ५ वर्षाच्या आतील बालक रूग्णांच्या आईवडीलांचे आधार,रेशन किंवा आयुष्यमान कार्ड तर इतर रूग्णांनी वरील कागदपत्रे सोबत आणावी अधिक माहितीसाठी डॉ.शुभम भारसाकळे, ७०२८३०३४२३ किंवा डॉ अभिजीत काकड ९१७५८३००७६ या क्रमांकवर नावनोंदणीसाठी संपर्क साधावा. दि ३१ मार्चपर्यंत ही नोंदणी सूरू राहणार आहे. 

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे संचालक जेष्ठ नेत्ररोग तज्ञ डॉ. एन एस आर्विकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. रेणूका पाटील, डॉ. निखील चौधरी, डॉ. नि.तु पाटील, डॉ.प्रिति लालसरे पाटील आणि सहायक तज्ञ डॉक्टरांची टीम परीश्रम घेत आहे. तरी जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.