Contact Banner

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन

 

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन


लेवाजगत न्यूज जळगाव, दि. ११ – सध्या पश्चिम आशिया प्रदेशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता,स्थानिक स्तरावर घरगुती गॅस सिलेंडरची संभाव्य टंचाई टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. 


घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर, साठेबाजी किंवा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर  जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे.

    या भरारी पथकात तहसीलदार, पोलीस निरीक्षक,उपनिरीक्षक, बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएलचे सेल्स अधिकारी तसेच निरीक्षण अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांचा समावेश आहे.


नागरिकांना घरगुती गॅस पुरवठ्याबाबत काही तक्रारी असल्यास 0257-2223180 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा dsojalgaon1@gmail.com या ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.