लोकसेवक मधुकरराव चौधरी केमिस्ट्री ऍप्टिट्यूड टेस्ट पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
लोकसेवक मधुकरराव चौधरी केमिस्ट्री ऍप्टिट्यूड टेस्ट पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
फैजपूर (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील रसायनशास्त्र विभागातर्फे आयोजित लोकसेवक मधुकरराव चौधरी केमिस्ट्री ऍप्टिट्यूड टेस्ट (LMCCAT) 2025-26 चा पारितोषिक वितरण समारंभ दि. ११ मार्च २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. या परीक्षेत राज्यातील विविध २५ महाविद्यालयांतील एकूण ३३७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. एस. के. चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. गुणवंत हरी सोनवणे (चेअरमन – रसायनशास्त्र अभ्यास मंडळ, क.ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) उपस्थित होते. यावेळी तापी परिसर विद्या मंडळाचे चेअरमन श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी, सचिव श्री मुरलीधर टी. फिरके, सहसचिव श्री नंदकुमार आसाराम भंगाळे, कार्यकारी सदस्य व माजी प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील, श्री संजय दादा चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र बी. वाघुळदे, उपप्राचार्य प्रा. एम. झेड. सुरवाडे तसेच प्रा. कल्पना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पल्लवी भंगाळे व प्रा. नाहीदा कुरेशी यांनी केले, तर प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. योगेश तायडे यांनी करून दिला.
यावेळी कु. नंदा आनंदा बाविस्कर (श्री. व्ही. एस. नाईक कॉलेज, रावेर) हिने आपल्या मनोगतातून लोकसेवक मधुकरराव चौधरी केमिस्ट्री ऍप्टिट्यूड टेस्टचे महत्त्व अधोरेखित करत ही परीक्षा विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले. तसेच स्थानिक समन्वयक डॉ. जयंत प्रल्हाद नेहेते (सरदार वल्लभभाई पटेल कॉलेज, ऐनपूर) यांनी या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना स्वतःचे मूल्यांकन करण्याची संधी मिळते, असे मत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. गुणवंत सोनवणे यांनी आपल्या भाषणात रसायनशास्त्र हा विषय रोजगाराभिमुख असून विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी निर्माण करणारा विषय असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. एस. के. चौधरी यांनी एलएमसीसीएटी परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांबाबत आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.
LMCCAT – 2026 परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
१) साहिल बापूराव पाटील – आर. एल. कॉलेज, पारोळा (देशात प्रथम क्रमांक)
२) रुपेश गंगाधर पाटील – सि. गो. पाटील कॉलेज, साक्री (देशात द्वितीय क्रमांक)
३) वैष्णवी गजानन मोलगे – आर. डी. आर. के. कॉलेज, बडनेरा, जि. अमरावती (देशात तृतीय क्रमांक)
या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. एस. के. चौधरी तसेच संचालक मंडळ व रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डी. बी. तायडे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार प्रा. शेरसिंग पाडवी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. ए. के. पाटील, डॉ. राकेश तळेले, डॉ. हरीश तळले, डॉ. मच्छिंद्र पाटील, प्रा. अचल भोगे, प्रा. विकास वाघुळदे, निलेश पाटील, हंशाली पाटील, चैताली पाटील, सुजित भाट, पूजा महाजन, जितेंद्र चौधरी, अरुण सैंदाणे व सिद्धार्थ तायडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत