गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात ‘फिनिक्स 2K26’ टेक्निकल इव्हेंट उत्साहात संपन्न
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात ‘फिनिक्स 2K26’ टेक्निकल इव्हेंट उत्साहात संपन्न
लेवाजगत न्यूज जळगाव : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सुप्त क्षमतांना चालना मिळावी आणि तांत्रिक ज्ञानासोबतच नवकल्पनांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात ‘फिनिक्स 2K26’ हा टेक्निकल इव्हेंट दि. 28 मार्च 2026 रोजी उत्साहात पार पडला.
या उपक्रमांतर्गत कोड वॉर, कॅड गुरु, फॉर्म्युला फन, बॅटल ऑफ ब्रेन्स, वेब क्राफ्ट एआय, पोस्टर प्रेझेंटेशन, शार्क टॅंक अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील प्रमुख उपस्थित होत्या. तसेच विशेष पाहुणे म्हणून श्री विनोद पाटील (सुप्रीटेंडिंग इंजिनीयर, एमएसईडीसीएल, जळगाव) उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, समन्वयक प्रा. दीपक झांबरे, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, रजिस्ट्रार डॉ. ईश्वर जाधव तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा. देवेंद्र फेगडे आणि विभागप्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी फिनिक्स उपक्रमाची माहिती देत हा उपक्रम मागील 23 वर्षांपासून अखंडपणे सुरू असल्याचे सांगितले. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये बहुआयामी ज्ञान विकसित होते, असे त्यांनी नमूद केले.
विशेष पाहुणे श्री विनोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याचे, संशोधनाकडे वळण्याचे आणि कौशल्य विकासावर भर देण्याचे आवाहन केले. त्यांनी सोलर इनोव्हेशनसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. वर्षा पाटील यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे महत्त्व ओळखून शिस्तबद्ध दिनचर्या ठेवण्याचा सल्ला देत अशा उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होण्याचे आवाहन केले.
या इव्हेंटमध्ये 700 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. जळगाव जिल्ह्यासह परिसरातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली.
विजेत्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 3000, 2000 व 1000 रुपये तसेच ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. बक्षीस वितरण समारंभासाठी इग्नाइट अकॅडमी, पॅशन सॉफ्टवेअर जळगाव, किरण अकॅडमी पुणे, सॉफ्टेड, इलेक्ट्रोसॉफ्ट व एम सॉफ्ट हे प्रायोजक उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षा वाघुळदे व रिद्धी भिरुड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. देवेंद्र फेगडे तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धांचे विजेते
कोड वॉर
प्रथम - प्रतीक भदाणे
द्वितीय - रीवा चव्हाण
तृतीय - हर्षल बोरसे
कॅड गुरु
प्रथम - प्रणित साळुंखे
द्वितीय - पूर्वेस अत्तरदे
तृतीय - पंकज साळी
फॉर्म्युला फन
प्रथम - ओम पाटील
द्वितीय - डिंपल भंगाळे
तृतीय - दुर्गेश चौरे
बॅटल ऑफ ब्रेन्स
प्रथम - पौर्णिमा थोरात
द्वितीय - पंकज सोनार
तृतीय - क्षितिज शहा
वेब क्राफ्ट एआय
प्रथम - राज सूर्यवंशी
द्वितीय - मेघराज दंडगव्हाळ
तृतीय - मोनिका राखंडे
पोस्टर प्रेझेंटेशन
प्रथम - देवयानी महाजन व चिन्मय पाटील
द्वितीय - अथर्व देशमुख व राजवर्धन ठाकूर
तृतीय - गौतम चंदनी
शार्क टॅंक
प्रथम - भावेश राठोड व कुणाल देवरे
द्वितीय - प्रांजल बावणे
तृतीय - निर्मल वरखेडे व गायत्री व्यवहारे
फ्री फायर
प्रथम - शिवराज पाटील, कार्तिकेश पाटील, उत्कर्ष चुडीवाले, रोहित पाटील
द्वितीय - मंगेश महाजन, यश पाटील, आदर्श कोळी, प्रज्वल पाटील
बीजीएमआय
प्रथम - कुणाल कावळे, परेश तायडे, यश कोल्हे, सोहन (व्हर्टेक्स गॅंग)
द्वितीय - वरून चव्हाण, ऋषी सुतार, जयेश तायडे (चॉकलेट गॅंग)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत