Contact Banner

"गोदावरी"च्या नाजनीन शेखने राष्ट्रपती भवनात जिंकली उपस्थितांची मने

 

godavari-nazneen-sheikh-rashtrapati-bhavanat-jinkli-upasthitanchi-mane


"गोदावरी"च्या नाजनीन शेखने राष्ट्रपती भवनात जिंकली उपस्थितांची मने
'पर्पल फेस्टिव्हल'मध्ये सुरेल सादरीकरणाने दाद

जळगाव (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : जळगाव येथील गोदावरी संगीत महाविद्यालयाची दिव्यांग, नेत्रहीन विद्यार्थिनी नाजनीन तबस्सुम जमील शेख हिने आपल्या मधुर आणि भावपूर्ण गायनाने थेट येथील अमृत उद्यानात रंगलेल्या ‘पर्पल फेस्टिव्हल’मध्ये उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

राष्ट्रपतींकडून विशेष दाद

नाजनीनने सादर केलेल्या "गणाधीशाय गुणमण्डिताय" या भक्तिगीताने संपूर्ण परिसर भारावून गेला. तिच्या गायनाने प्रभावित होऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच उपस्थित मान्यवरांनी तिचे विशेष कौतुक करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. एका सामान्य कुटुंबातील दिव्यांग विद्यार्थिनीने थेट राष्ट्रपती भवनात आपली कला सादर करत जळगाव जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.

जिद्द, मेहनत आणि स्वप्नांचा प्रवास

नाजनीन सध्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या ‘मनोबल’ प्रकल्पांतर्गत दिल्ली येथे सहभागी झाली होती. ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत असून, तिच्या गायनकौशल्याला पैलू पाडण्याचे काम गोदावरी संगीत महाविद्यालयात सुरू आहे. मागील तीन वर्षांपासून प्राचार्या पद्मजा नेवे व इतर गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली ती शास्त्रीय संगीताचे सखोल शिक्षण घेत आहे.

मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव

नाजनीनच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, संचालक डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रमोद भिरूड यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

नाजनीनच्या या यशामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतीही उंची गाठता येते, हे तिने सिद्ध करून दाखवले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.