Contact Banner

जळगावच्या महादेव हॉस्पिटलमध्ये 'आरोग्याची गुढी' उत्साहात साजरी निकोप आरोग्याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन


jalgaon-mahadev-hospital-arogyachi-gudhi-utsahat-sajri-tadnya-doctor-margadarshan


 जळगावच्या महादेव हॉस्पिटलमध्ये 'आरोग्याची गुढी' उत्साहात साजरी

निकोप आरोग्याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन 


लेवाजगत न्यूज जळगाव : गुढीपाडव्याचे औचित्य साधून जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील प्रसिद्ध महादेव हॉस्पिटल येथे गुरुवारी 'आरोग्याची गुढी' मोठ्या उत्साहात उभारण्यात आली. केवळ सण साजरा न करता, समाजात आरोग्याप्रती जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे, कोणत्याही मान्यवराऐवजी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाच्या हस्ते विधीवत गुढी उभारण्यात आली. गुढी उभारल्यानंतर उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. यावेळी डॉक्टरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.नियमित तपासणी करून आजार बळावण्यापूर्वीच त्याचे निदान करण्याचे महत्त्व सांगितले. बदलत्या ऋतूंमध्ये आहाराची आणि व्यायामाची काळजी कशी घ्यावी, मानसिक आरोग्य कसे चांगले राखावे, सण-उत्सवाच्या काळात सकारात्मक राहून आजारावर कशी मात करावी याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली. 


याप्रसंगी महादेव हॉस्पिटलमधील विविध विभागांचे तज्ज्ञ डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व डॉक्टरांनी रुग्णांना आणि त्यांच्या परिवाराला नवीन वर्षाच्या आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.