Contact Banner

महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज ‘संत मुक्ताई रत्न पुरस्काराने’ सन्मानित- कुंभारखेडा येथे ‘मुक्ताई फिरता नारळी सप्ताह’ समारोप;



कुंभारखेडा येथे ‘मुक्ताई फिरता नारळी सप्ताह’ समारोप; महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज ‘संत मुक्ताई रत्न पुरस्काराने’ सन्मानित

लेवाजगत न्यूज कुंभारखेडा : येथील मुक्ताई फिरता नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. सप्ताहाच्या निमित्ताने सकाळी ज्ञानेश्वरी पारायण तसेच रामगिरी महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. सप्ताहाच्या सांगता दिवशी सकाळी ह.भ.प. रविंद्र हरणे यांचे काल्याचे कीर्तनही भक्तिभावात पार पडले.

या वेळी फैजपूर येथील सतपंथ मंदिराचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांना यावर्षीचा ‘संत मुक्ताई रत्न पुरस्कार’ श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानतर्फे उपस्थित संतांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सन्मानाला उत्तर देताना महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज म्हणाले की, “हा सन्मान माझा नसून संपूर्ण सतपंथ परिवाराचा आहे.” सर्व पंथांना एकत्र घेऊन हिंदू धर्म एकसंघ करण्याचे कार्य आपण सातत्याने करत राहणार असल्याचे त्यांनी उपस्थित हजारो भाविकांसमोर सांगितले.

या प्रसंगी मुक्ताई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील, मुक्ताई पालखीचे प्रमुख ह.भ.प. रविंद्र हरणे, ह.भ.प. नरेंद्र नारखेडे, केतकीताई पाटील, देगलूरकर महाराज तसेच इतर संत-महंत, हरिभक्त, पारायण मंडळ आणि मुक्ताई फळातील सर्व उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात भक्ती, सेवा आणि संतपरंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले असून संपूर्ण परिसरात भक्तिमय व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.